26 November 2020

News Flash

महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची ‘ही’ संख्या काळजी वाढवणारी

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६२ मृत्यूंची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकीकडे दुसऱ्या लाटेचा इशारा समोर आलेला असताना महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. अनलॉक सुरु झाल्यानंतर आणि स्वंयशिस्त न पाळल्याने ही संख्या वाढताना दिसते आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांच्या घरांमध्ये होती. मागील २४ तासांमध्ये ५ हजार ७६० रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात ४ हजार ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ४७ हजार ४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८२ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ५ हजार ७६० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ इतकी झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १ लाख २० हजार ४७० नमुन्यांपैकी १७ लाख ७४ हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २२ हजार ८१९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७९ हजार ८७३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज नोंद झालेल्या ६२ मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागी ४८ तासांमधले आहेत. तर १० मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

मुंबईत १०९२ नवे रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १०९२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १०५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत मुंबईत एकूण २ लाख ७४ हजार ५७२ रुग्णांना करोनाची बाधा झाली. यापैकी एकूण २ लाख ५१ हजार ५०९ रुग्णांनी करोनावर मात केली. मुंबईत करोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत एकूण १० हजार ६५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत ९ हजार ३२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 9:11 pm

Web Title: maharashtra reports 5760 new covid19 cases 4088 recoveries and 62 deaths scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “मुक्तार अब्बास नक्वी, शाहनवाज हुसैन यांनी केलं तर ‘लव्ह’, इतरांनी केलं तर लव्ह जिहाद”
2 हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळे ओवेसींवर आजवर कधीही हल्ला झालेला नाही-फडणवीस
3 “भाजपाला हल्ली ‘जय’ आणि ‘नाथ’ चालत नाहीत”; धनंजय मुंडेंचा टोला
Just Now!
X