26 November 2020

News Flash

राज्यात चोवीस तासांत ६,०५९ करोनाबाधितांची नोंद; ११२ रुग्णांचा मृ्त्यू

पुण्यात दिवसभरात आढळले २९२ रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात चोवीस तासांत ६,०५९ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५,६४८ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ही १६,४५,०२० वर पोहोचली असून यांपैकी १४,६०,७५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजवर ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १,४०,४८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सध्याचा मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. सध्या २५,१८,०१६ लोक होम क्वारंटाइन आहेत तर १३,५७२ लोक हे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन आहेत.

पुण्यात दिवसभरात आढळले २९२ रुग्ण 

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २९२ रुग्ण आढळले तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच करोनावर उपचार घेणार्‍या ४५४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं. पुणे महापालिकेच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६६ करोनाबाधितांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, ११९ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 10:26 pm

Web Title: maharashtra reports 6059 new covid19 cases and 112 deaths as per their public health department aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘टाचणी’ तयार आहे, फक्त योग्य वेळ येऊन द्या; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
2 पंतप्रधानांनी प्रामाणिकपणे चूक मान्य करून सुधारणा करावी -उद्धव ठाकरे
3 रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप भाडोत्री नाही; उद्धव ठाकरेंचे फटकारे
Just Now!
X