महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातल्या सीमांवर तपासणी करण्यात येते आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यातून येणाऱ्यांचीही चाचणी होते आहे. अशात करोना रुग्णांची आजची संख्या टेन्शन वाढवणारी आहे. आज राज्यात ६ हजार १५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८४४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ६ हजार १५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. आज नोंदवण्यात आलेल्या ६५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra reports 6159 new covid 19 cases taking tally to 1795959 scj
First published on: 25-11-2020 at 19:49 IST