News Flash

Coronavirus – दिलासादायक : राज्यात दिवसभरात ७४ हजार ४५ रूग्णांची करोनावर मात

आज ६६ हजार ८३६ नवीन करोनाबाधित आढळले, ७७३ रूग्णांचा मृत्यू

संग्रहीत

राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. अशा परिस्थितीत आज काहीसे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे. आज दिवसभरात आढळून आलेल्या करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या ही अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात आज ७४ हजार ४५ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६६ हजार ८३६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ७७३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ३४,०४,७९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.८१ टक्के एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे ६३ हजार २५२ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५१,७३,५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१,६१,६७६ (१६.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८८,२६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९१,८५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज(शुक्रवार) जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलीस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टँकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.

“राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा”

राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिविरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

पुण्यात दिवसभरात ४ हजार ४६५ नवीन करोनाबाधित, ५ हजार ६३४ जण करोनामुक्त – 

पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ४६५ करोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोर शहरातील एकूण बाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ४९५ झाली आहे. आजपर्यंत ६ हजार ३८८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ५ हजार ६३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख ३४ हजार ७८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज  २ हजार ४१७ करोनाबाधित, ७१ जणांचा मृत्यू – 

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार ४१७ जण तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील ७५ जण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर १ हजार ८३३ जण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७१ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, यापैकी ४३ जण हे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ९५ हजार ९२९ वर पोहचली असून यापैकी, १ लाख ६९ हजार २३५ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३८४ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 9:35 pm

Web Title: maharashtra reports 66836 new covid19 cases 74045 recoveries and 773 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा”
2 पालकांना मोठा दिलासा; वाढीव फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेला बसण्यापासून रोखता येणार नाही!
3 वर्धा : जम्बो कोविड केंद्रासाठी खासदार तडस यांनी घेतली फडणवीसांची भेट
Just Now!
X