राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्युच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक करत, लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र तरी देखील रूग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १३ करोनाबाधित वाढले असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे.

याशिवाय आज ६२ हजार २९८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

रेमडेसिविर वाटपात केंद्राचा महाराष्ट्रावर उघड अन्याय; गुजरातवर विशेष प्रेम

करोना रुग्णांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असताना केंद्राकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक मदतीत दुजाभाव दाखवला जात असल्याचे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.