X

Coronavirus : राज्यात दिवसभरात ६७ हजार १२३ करोनाबाधित वाढले, ४१९ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशभरासह राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. राज्यात सध्या १५ दिवसांची संचारबंदी सुरू आहे, मात्र तरी देखील रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. परिणामी राज्यात कडक लॉकडाउन जाहीर करण्याचेही मंत्र्यांकडून बोलले जात आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोनाबाधित वाढले असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.५९ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.  राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज राहू – उद्धव ठाकरे

दरम्यान, आज दिवसभरात ५६ हजार ७८३ रूग्ण बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.१८ टक्के एवढे झाले आहे.

“महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या”

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात ६ हजार ६ रुग्ण नव्याने आढळले, ५४ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ६ हजार ६ करोनाबाधित रुग्ण वाढले असून, ५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या ३ लाख ६० हजार ८०३ झाली आहे. तर आजपर्यंत ६ हजार ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ५ हजार ६०९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर २ लाख ९९ हजार ७८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

23
READ IN APP
X