News Flash

राज्यात आज ८ हजार ४३० जणांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ८९.५३ टक्क्यांवर

दिवसभरात ६ हजार ७३८ नवे करोनाबाधित वाढले, तर ९१ रुग्णांचा मृत्यू झाला

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज देखली राज्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात ८ हजार ४३० जणांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ८९.५३ टक्क्यांवर पोहचले आहे.

याचबरोबर आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४३० नवे करोनाबाधित आढळले असून, ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १६ लाख ६० हजार ७६६ वर पोहचली आहे. यामध्ये बरे झालेले १४ लाख ८६ हजार ९२६ जण, १ लाख २९ हजार ७४६ अॅक्टिव्ह केसेस व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २९ हजार ७४६ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८७९ नमून्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ नमूने (१८.९४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीस राज्यात २५ लाख २८ हजार ५४४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर १२ हजार ९८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 8:22 pm

Web Title: maharashtra reports 6738 new covid19 cases 8430 recoveries and 91 deaths today msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मराठा आरक्षण: ठाकरे सरकारची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
2 “नेमका काय गोंधळ…,” सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
3 दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला महत्वाचा निर्णय