News Flash

Coronavirus : राज्यात दिवसभरात ५०३ रूग्णांचा मृत्यू , ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले

४५ हजार ६५४ रुग्ण आज करोनातून बरे देखील झाले आहेत

संग्रहीत छायाचित्र

राज्यातील करोना संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. सध्या राज्यात १५ दिवसांची संचारबंदी सुरू आहे. सरकारकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखली रूग्णसंख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ४५ हजार ६५४ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१,०६,८२८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८०.९२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातल्या ५० टक्के करोना बाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू

दरम्यान, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले गेलेले कोविडि-19 पॉझिटिव्हच्या ५० टक्के सॅम्पल्समध्ये SARS-CoV-2 नावाचा नवा आणि अत्यंत संसर्गजन्य असा भारतीय प्रकारचा विषाणू आढळला आहे. या विषाणूच्या प्रकाराला B.1.617 म्हटले जात आहे.

पुण्यात दिवसभरात ६ हजार ४३४ करोनाबाधित वाढले, ५३ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ६ हजार ४३४ करोनाबाधित रुग्ण वाढले असून, ५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांचीं संख्या ३ लाख ६७ हजार २३७ झाली आहे. तर आजपर्यंत ६ हजार १०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४ हजार ७१२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख ४ हजार ४९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 9:05 pm

Web Title: maharashtra reports 68631 fresh covid cases and 503 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं ”
2 “…तर सगळ्या करोनाग्रस्ताना घेऊन मी ‘मातोश्री’वर जाऊन ठाण मांडणार ”
3 हे कृत्य करून तुम्ही चुकलात… याची किंमत मोजावी लागणार; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा
Just Now!
X