Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018:  मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी, ८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर होत असून निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून (९ जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल. यंदा राज्यभरातून सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

दहावीचा निकाल किती वाजता जाहीर होणार?

दहावीचा निकाल शुक्रवारी (८ जून) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

How to see Maharashtra SSC 10th result 2018 online निकाल कुठे बघता येणार?

परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील वेबसाईटवर उपलब्ध असतील:

http://www.mahresult.nic.in

http://www.sscresult.mkcl.org

http://www.maharashtraeducation.com

How to check Maharashtra SSC 10th result 2018 by SMS: एसएमएसद्वारे निकाल कसा बघता येणार?

दहावीचा निकाल बीएसएनएलच्या मोबाइल ग्राहकांना एसएमएसद्वारेही उपलब्ध असेल.
बीएसएनएलच्या ग्राहकांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यावा यानंतर आसनक्रमांक टाईप करावा आणि ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा.

दहावीच्या निकालाच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा

निकाल कसा बघता येईल?

गुणपडताळणीसाठी अर्ज कुठे ?

९ जूनपासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येतील. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी आवश्यकता असल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

दरम्यान, गेल्या वर्षी दहावीचा निकाल १३ जूनला जाहीर करण्यात आला होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये ९ जून, तर २०१५ मध्ये ८ जूनलाच निकाल जाहीर झाला होता. या पार्श्वभूमीवर, यंदा तुलनेत लवकरच निकाल जाहीर होत आहे.