28 September 2020

News Flash

दहावीचा निकाल आज लागणार का? अद्याप संभ्रम

निकाल नेमका कधी लागणार याबबात सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

Maharashtra SSC Result 2019 : गेल्या वर्षीपेक्षा यंदा बारावीचा निकाल दोन दिवस आधी म्हणजे २८ मे रोजी लागला. त्यामुळे दहावीचा निकालही यंदा लवकर लागणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जे सूत्रांकडून संकेत मिळतायत ते बघता दहावीचा निकाल आज म्हणजे 6 तारखेला लागण्याची शक्यता आहे.  मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आजच निकाल लागण्याबाबत दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निकाल नेमका कधी लागणार याबबात सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी अशा कोणत्याही अफवावर लक्ष देऊ नये. गेल्या वर्षी आठ जून रोजी दहावीचा निकाल लागला होता. यंदाही याच तारखेच्या आसपास कदाचित एखाद दोन दिवस आधीच दहावीचा निकाल लागेल का याकडे विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागलेले आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल लवकरच लागणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार दहावीचा निकाल दहा जूनच्या आत लागणार असल्याचे समजतेय. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरीत्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता. त्यामुळे यंदाही दहावीच्या निकालची तिच तारीख निवडली जाऊ शकते आणि कदाचित बारावीचा निकाल जसा दोन दिवस आधी लागला तसाच दहावीचा निकालही आधी लागू शकतो.   www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर होऊ शकते.

येथे पाहू शकाल निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.

असा पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 12:47 pm

Web Title: maharashtra ssc 10th result 2019 mahresult nic in nck 90
Next Stories
1 कारमध्ये गुदमरून मुलाचा मृत्यू
2 अहमदनगरमध्ये प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू
3 रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास सुरुवात
Just Now!
X