Maharashtra SSC 10th Result 2019 Live Updates दहावीचा निकाल कधी जाहीर होणार या उत्तराची प्रतीक्षा शुक्रवारीच संपली आहे. दहावी बोर्डाचे निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७. २७ टक्के इतका लागला आहे. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के. निकालात तब्बल १२ टक्के घट. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटला आहे अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
nagpur, vidarbha, Cooler, Electric Shock, Rising Cases, Tips, Prevent, summer, heat, marathi news,
तुमच्याकडे कूलर लागलाय का?, मग ‘हे’ वाचाच….

पहा व्हिडिओ

मार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या होती ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या होती ८ लाख ७० हजार ८८७. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के इतका लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे ७२.१८ टक्के त्याचमुळे यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. अशीही माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

 

निकालासाठीची संकेतस्थळे

  • mahresult.nic.in
  • maharashtraeducation.com
  • hscresult.mkcl.org

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

Live Blog

12:50 (IST)08 Jun 2019
राज्यातल्या फक्त २० विद्यार्थ्यांनाच १०० टक्के गुण

दहावीच्या परीक्षेत राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत तर २५ हजार ९४१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

11:49 (IST)08 Jun 2019
विद्यार्थिनींचा निकाल विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त

मार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या होती ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या होती ८ लाख ७० हजार ८८७. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के इतका लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे ७२.१८ टक्के त्याचमुळे यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे.

11:40 (IST)08 Jun 2019
दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल

दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना हे निकाल दुपारी १ वाजल्यापासून पाहता येणार आहेत 

11:28 (IST)08 Jun 2019
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

विभागवार निकालांचा विचार केला तर कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे. ८८.३८ टक्के इतका निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागाची टक्केवारी ही सर्वात कमी म्हणजे ६७.२७ टक्के इतकी आहे

11:21 (IST)08 Jun 2019
निकालाची विभागवार टक्केवारी

पुणे विभाग ८२. ४८ टक्के
नागपूर विभाग ६७.२७ टक्के
औरंगाबाद विभाग ७५.२० टक्के
मुंबई विभाग ७७.०४ टक्के
कोल्हापूर विभाग ८६.५८ टक्के
अमरावती विभाग ७१.९८ टक्के
नाशिक विभाग ७७.५८ टक्के
लातूर विभाग ७२.८७ टक्के
कोकण विभाग ८८.३८ टक्के

11:16 (IST)08 Jun 2019
यंदाच्या निकालातही मुलींचीच बाजी

प्रथम श्रेणीमध्ये ४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत

एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती 

यंदाच्या निकालातली मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे 

१६ लाखपैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण 

11:15 (IST)08 Jun 2019
महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू

दहावीचा निकाल ऑनलाईन दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे या पत्रकार परिषद घेत आहेत 

11:15 (IST)08 Jun 2019
महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू

दहावीचा निकाल ऑनलाईन दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे या पत्रकार परिषद घेत आहेत 

11:15 (IST)08 Jun 2019
महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू

दहावीचा निकाल ऑनलाईन दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे या पत्रकार परिषद घेत आहेत 

11:15 (IST)08 Jun 2019
महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू

दहावीचा निकाल ऑनलाईन दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे या पत्रकार परिषद घेत आहेत