News Flash

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ ते ३० नोव्हेंबर, विरोधक म्हणतात कालावधी वाढवा

अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार असून या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ९ दिवस चालणार आहे. त्यामुळे या विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला. १९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन होणार आहे. सुट्टीचे दिवस वगळता फक्त ९ दिवसच कामकाज चालणार आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असून या मुद्द्यावरुनच हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे जास्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 12:03 pm

Web Title: maharashtra state assembly winter session 2018 between 19 to 30 november
Next Stories
1 कडेकोट बंदोबस्तात अहमदनगरमधून ‘जायकवाडी’साठी पाण्याचा विसर्ग सुरू
2 तोंडात सुतळी बॉम्ब फुटल्याने बुलढाण्यात ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X