22 October 2020

News Flash

सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १० आणि ११ मार्च रोजी सीईटी

( प्रतिकात्मक छायाचित्र )

महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा चाचणी कक्षाच्या वतीने २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. एमबीएसाठीची प्रवेश परीक्षा १० आणि ११ मार्च रोजी तर १० मे रोजी अभियांत्रिकी शाखेसाठी परीक्षा होणार आहे.

राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येते. २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १० आणि ११ मार्च रोजी सीईटी पार पडेल. तर एमसीएसाठी २४ मार्च रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाईल. बीई, बीटेक, बॅचलर इन फार्मसीसाठी १० मेरोजी सीईटी होणार आहे. तर बॅचलर इन फाइन आर्ट्ससाठी १३ मेरोजी, मास्टर्स आर्किटेक्चरसाठी आणि मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी २० मे रोजी सीईटी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 4:18 pm

Web Title: maharashtra state cet 2018 tentative schedule declared be btech mba mca bpharm cet
Next Stories
1 असे घडणार फ्यूचर मॅनेजर?; औरंगाबादमध्ये व्हॉटसअॅपवरून एमबीएचा पेपर लिक
2 नववर्षांचे जल्लोषात स्वागत..
3 नांदेडच्या गुरुद्वारा मंडळाचे ६१ कोटींचे कर्ज माफ करू
Just Now!
X