News Flash

करोनाने निराधार झालेल्या बालकांना आता शासनाचा आधार!

महिला व बालकल्याण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचं संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयतल्या न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) करोनाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता या टास्कफोर्सच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

त्याचप्रमाणे या बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे, बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेणे ही जबाबदारीही या टास्क फोर्सच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे.त्याचबरोबर या काळात १०९८ या हेल्पलाईन नंबरलाही व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव असून ते करोनाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची संबधित यंत्रणेकडून दर आठवड्यास माहिती प्राप्त करुन घेऊन महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत राज्य शासनाला सादर करतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 9:50 pm

Web Title: maharashtra state children of patients died due to covid are governments responsibility vsk 98
Next Stories
1 नितीन गडकरींच्या हस्तक्षेपामुळे रूग्णालायस अतिरिक्त खाटांच्या परवानगीसह वैद्यकीय साहित्याची मदत
2 “ममता बॅनर्जींची तुलना आहिल्यादेवी होळकरांशी, इथेच संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली”
3 ४५ वयापुढील साडेपाच लाख लोकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उपलब्ध नाही!
Just Now!
X