News Flash

राज्यात ४६हजार नवे बाधित, तर ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले!

आजही पुण्यात सर्वाधिक नव्या बाधितांची नोंद झाली.

प्रातिनिधिक (PTI)

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच राज्यातली रुग्णसंख्याही काहीशी चिंताजनक आहे.
राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात आज ४६हजार ७८१ नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे.

आज राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर हा गेल्या काही दिवसांपासून १.४९ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

आजही पुण्यातली रुग्णसंख्या ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४हजार ३६३ इतकी आहे. तर त्याखालोखाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १५२ नव्या बाधितांची नोंद झाली. तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे १० नव्या बाधितांची नोंद झाली.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सर्वाधिक म्हणजे ६६ मृत्यूंची नोंद झाली. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तसंच मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही. तर उल्हासनगर महापालिका क्षेत्र, पालघर, धुळे, नंदुरबार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र या भागांमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 7:49 pm

Web Title: maharashtra state covid patients detailed numbers vsk 98
Next Stories
1 ‘माझ्या देशात लोक मरत असताना मी लग्न…’, अभिनेत्रीने घेताला मोठा निर्णय..
2 राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय
3 “स्वतःच्या कौतुकाची टीमकी वाजवण्यातच मशगुल असणाऱ्या राज्य सरकारचे न्यायालयाने वाभाडे काढले”
Just Now!
X