करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे रुग्णबाधित रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९४.७३ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ३०७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय करोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे करोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

राज्यात आजपर्यंत ३ कोटी ५७ लाख ७४ हजार ६२६ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ९१ हजार ४१३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर १६.१९ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १५ लाख ६६ हजार ४९० रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ७ हजार ५५ रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’; गोपीचंद पडळकरांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातही रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबईत १८ हजार २४५, ठाण्यात १६ हजार ७४०, पुण्यात २६ हजार ४४३, नाशिकमध्ये ६ हजार १९४, नागपूरमध्ये ९ हजार ७१९ तर औरंगाबादमध्ये ३ हजार ५८५ करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

“अपरिपक्वता की श्रेयवाद?” लॉकडाउनच्या संभ्रमावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा!

वडेट्टीवारांनी केली होती ५ टप्प्यांची घोषणा!

गुरुवारी दुपारी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर ५ गटांमध्ये विभागणी केल्याची घोषणा केली. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या आणि २५ टक्क्यांच्या खाली ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासोबतच, या पाचही गटांमध्ये ताज्या आकडेवारीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याची यादी देखील त्यांनी यावेळी जाहीर केली. मात्र, आता राज्य सरकराने हा निर्णयच अजून अंतिम झालेला नसल्याचं जाहीर केल्यामुळे यावरून आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.