08 March 2021

News Flash

राज्याचे आर्थिक चित्र निराशाजनक; आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष

भाजप-शिवसेना युतीचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी सादर होणार असताना, राज्याचे आर्थिक चित्र मात्र फार आशादायी नसल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

| March 17, 2015 05:15 am

भाजप-शिवसेना युतीचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी सादर होणार असताना, राज्याचे आर्थिक चित्र मात्र फार आशादायी नसल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मंगळवारी विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सादर केला. कृषी, उद्योग  आणि सेवा क्षेत्राच्या विकासदरात  गतवर्षीच्या तुलनेत घसरण झाल्याची नोंद या पाहणी अहवालात करण्यात आली आहे.
राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज असून एकूण विकासाचा दर ७.३ टक्यांवरून ५.७ टक्यांवर घसरला आहे. आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून गाजलेल्या सिंचन क्षेत्राच्या आकडेवारीबाबत मात्र आर्थिक पाहणी अहवालात मौन बाळगण्यात आले आहे.
कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासदरांमध्ये गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत घसरण झाली आहे. औद्योगिक विकासाचा दर घसरून ४.५ टक्के, कृषी क्षेत्राचा ८.५ टक्के  आणि सेवा क्षेत्राचा दर ८.१ टक्यांवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 5:15 am

Web Title: maharashtra state economical survey report in vidhansabha
टॅग : Maharashtra
Next Stories
1 भाजपची कोंडी करण्यासाठी सेनेचे आंदोलन
2 कॉ.गोविंद पानसरे हल्ला तपास महिन्यानंतरही प्रगतीविना
3 दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा
Just Now!
X