महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरला नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलीन करत भाजपाप्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण १० दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. भाजपासोबत राहायचं की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं होतं. नारायण राणेंसोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणेही भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे अद्यापही भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. भाजपाकडून नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत प्रवेश देण्यात आलेला नाही. नारायण राणे यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. यावर बोलताना नारायण राणे यांनी वेटिंगलाही लिमिट असते असं म्हणत आगामी १० दिवसांत निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केलं होतं.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात

“येणाऱ्या १० दिवसांत मी भाजपासंबंधी निर्णय घेणार आहे. १० दिवसांनतर मी भाजपात असेन की माझा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी निर्णय घेईन”, असं नारायण राणे यांनी सांगितलं होतं. पुढे त्यांनी म्हटलं होतं की, “भाजपाने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत. त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री यासंबंधी चार पाच दिवसांत मला सांगतील. त्यानंतर मी निर्णय घेईन”. यावेळी त्यांनी प्रतिक्षेलाही मर्यादा असते सांगत आपली नाराजी व्यक्त केली होती.