News Flash

राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वृृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या चित्ररथाच्या महाराष्ट्र दौऱ्यात सदस्य नोंदणी होणार आहे.

जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडा दाखविताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार .

चांदा ते बांदा जनजागृती चित्ररथाला वनमंत्र्यांचा हिरवा झेंडा

गेल्या वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीमुळे ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’मध्ये नाव नोंदवण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेला आता येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठायचे आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेला या वर्षी गतिशील व महाराष्ट्रव्यापी केले असून सोमवारी, महाराष्ट्र दिनी चांदा ते बांदा जनजागृतीला निघालेल्या चित्ररथाला त्यांनी हिरवा कंदील दाखवला.

राज्याच्या वन विभागातर्फे चित्ररथ महाराष्ट्र भ्रमण करणार आहे. चंद्रपूरयेथून १ मे रोजी या चित्ररथाचा प्रवास सुरू झाला. ग्रीन आर्मी (हरित सेना)मध्ये सहभागी होण्याचे आणि वन व वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन राज्यातील बहुतांश जिल्हय़ातून प्रवास करणाऱ्या चित्ररथामार्फत केले जाणार आहे. या चित्ररथाला मोठा ‘डिजिटल स्क्रीन’ असून त्यावर या मोहिमेचे महत्त्व विशद करणाऱ्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. १० संगणकांची जोड देण्यात आलेल्या या चित्ररथाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे आवाहन करणारे प्रसिद्धी साहित्यही वाटप करण्यात येणार आहे.

काय होणार?

वृृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या चित्ररथाच्या महाराष्ट्र दौऱ्यात सदस्य  नोंदणी होणार आहे. हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व सावंतवाडी असा प्रवास करणार आहे. महाराष्ट्रात या चित्ररथाचे ठिकठिकाणी स्वागत व्हावे व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सुरू झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

हरित लष्कर

गेल्यावर्षी २ कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर २०१७ मध्ये ४ कोटीचे, २०१८ मध्ये १३ कोटीचे व २०१९ या वर्षांकरिता ३३ कोटींचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष संख्या महाराष्ट्रात वाढविण्याचा मुनगंटीवार यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वृक्ष, वन व वन्यजीव यांच्यामध्ये आवड असणाऱ्या  १ कोटी नागरिकांचे हरित लष्कर ( ‘ग्रीन आर्मी’)  बनवण्याचा वनमंत्र्यांचा संकल्प आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:20 am

Web Title: maharashtra targets 50 crore tree plantation
Next Stories
1 दिल्ली- मुंबई कॉरिडोरसाठी आता सक्तीने भूसंपादन?
2 महाराष्ट्रवादी विरुद्ध विदर्भवाद्यांची अस्मितेची लढाई कायम
3 अन् त्या शिक्षकाने हुंडय़ासाठी लग्न मोडले
Just Now!
X