News Flash

उपकनिष्ठ राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या नवव्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी नाशिक येथे महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जम्परोप

| February 14, 2013 04:56 am

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या नवव्या उपकनिष्ठ राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी नाशिक येथे महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जम्परोप संघटनेचे अध्यक्ष रमेश मारवाडी, सरचिटणीस अशोक दुधारे यांनी संघाची घोषणा केली. मुलांच्या संघात आयुष मानकर, शंतनु पाटील, अनिमेश भावसार, तन्मय कर्णिक (सर्व नाशिक), शिवम कानगी, हर्षद काकडे, शुभम पतंगे, ऋषी देशमुख, शिवराज भांडगर, नीलेश सुरसे, सौरभ वैजला, सौरभ पोल (सर्व सोलापूर), प्रथमेश सुतार (कोल्हापूर), राजदीप कदम, विश्वराज यादव, कौस्तुभ कुमार (सर्व सातारा) तर मुलींच्या संघात हिरण्यमयी धर्माधिकारी (वाशीम), शुभांगी वझे, राधिका वझे (बीड), ऐश्वर्या शिंदे (सोलापूर) यांचा समावेश आहे. संघ मार्गदर्शक म्हणून पांडुरंग गुरव व श्रीराम धर्माधिकारी काम पाहाणार आहेत.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:56 am

Web Title: maharashtra team announced for deputy junior national jumprope compitition
टॅग : Sports
Next Stories
1 साहित्य अकादमीच्या काव्यमहोत्सवासाठी ऐश्वर्य पाटेकर आमंत्रित
2 पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप
3 गिरणा धरणात बुडून तिघांचा मृत्यू