News Flash

राज्य उन्हाने होरपळले

एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवडय़ात सूर्य आग ओकू लागला असून तापमान तब्बल ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे.

राज्य उन्हाने होरपळले
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवडय़ात सूर्य आग ओकू लागला असून तापमान तब्बल ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढीस लागले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्य़ातील सर्व डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यात आले असून उष्माघाताच्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात २४ तास शीतकक्ष हे आपत्कालीन उपचार केंद्र कार्यरत करण्यात आले. आता उष्णता लहरी आणि तापमान वाढ हे विषय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ातही समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्य़ात दरवर्षीच कमालीचे तापमान असते. अनेक वेळा ते ४४ अंशाच्याही पुढे जाते. त्यामुळे उष्माघात व उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
सध्या तापाची साथ असून अनेक लहान मुले या आजाराने ग्रस्त आहेत. रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात
लातूर -गेल्या चार दिवसांपासून लातूरकरांना उन्हाच्या तडक्यास सामोरे जावे लागत असून शुक्रवारी तापमानाचा पारा ४३.५ अंशांवर स्थिरावला.

उत्तर महाराष्ट्रात उष्माघाताचा बळी
भडगाव : तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील रहिवासी रवींद्र रघुनाथ माळी (४०) यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. माळी हे सकाळी शेतात गेले असता दुपारी घरी परत येत असताना रस्त्यात चक्कर येऊन पडले. त्यांना जवळच्या मंदिरात पाणी पाजून परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

ब्रम्हपुरी ४६ अंशांवर
नागपूर/चंद्रपूर : विदर्भात उष्णतेची लाट प्रचंड वेगाने पसरत असून चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपुरीचे तापमान आज ४६ अंश सेल्सिअस इतके होते. उन्हाचा तडाखाच इतका होता की, सायंकाळीसुद्धा नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. ब्रम्हपुरीपाठोपाठ चंद्रपुरातील तापमानात थोडी घट होऊन पारा ४५.६ अंश सेल्सिअसवरून ४५ वर आला. मात्र, उन्हाच्या झळा तितक्याच तीव्र होत्या. तापमानवाढीचा हा वेग इतका आहे की, मे महिन्यात ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणारा तापमानाचा पारा एप्रिल अखेरीसच ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 2:42 am

Web Title: maharashtra temperature increase
Next Stories
1 तब्बल ९२ लाखांचा हिरा साईचरणी अर्पण
2 ‘दारूवाली बाई’ टीकेवरून नवाब मलिकांविरुद्ध तक्रार
3 महायुतीच्या सर्व योजनांना माझ्या कल्पनांचा आधार!
Just Now!
X