News Flash

राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाची सूत्रं

संग्रहित छायाचित्र

आज (शुक्रवार) राज्य सरकारनं राज्यातील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. दरम्यान १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहे.

आज राज्यातील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या हाती आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सामान्य प्रशासन मुख्य प्रोटोकॉल अधिकारी आणि प्रधान सचिवपदाची जबाबदारी होती. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडे आता पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशुतोष सलिल हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

२०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या खांद्यावर आता यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भंडारा ही जबाबदारी देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 4:37 pm

Web Title: maharashtra three ias officers transfer mantralaya cm uddhav thackeray manisha mhaiskar ashutosh salil bmc jud 87
Next Stories
1 “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा होईल असा विचार करा”; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2 ‘ते’ वडाचं झाड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले; नितीन गडकरींना लिहिलं पत्र
3 सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची गरज नाही : गृहमंत्री देशमुख
Just Now!
X