News Flash

राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; २५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली

देवेन भारती यांचीही उचलबांगडी, स्वंतंत्रपणे आदेश देणार

राज्यातील पोलीस दलात आज (बुधवार) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृहविभागाकडून २५ अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्तपदही भूषवलं आहे. तर रजनीश सेठ यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी होती. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे नागरी संरक्षण विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राजेंद्र सिंह यांच्याकडे अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आशुतोष डुंबरे यांच्याकडे राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र मुंबई या पदाच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अँटी करप्शन विभाग मुंबईच्या अप्पर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी होती. अमितेश कुमार यांच्याकडे नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाची तर जय जित सिंह यांच्याकडे अँटी करप्शन विभागाच्या अप्पर महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त व्ही.के.चौबे यांची अँटी करप्शन विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. सदानंद दाते यांच्याकडे मीरा-भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदाचा तर बिपिन कुमार सिंह यांच्याकडे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आल्या आहे. तर डॉ. जय जाधव यांनादेखील बढती देण्यात आली आहे. याशिवाय निसार तांबोळी, चंद्र किशोर मिणा, संजय दराडे. विरेश प्रभू, सत्य नारायण, ज्ञानेश्वर चव्हाण. नामदेव चव्हाण, आरती सिंग, एस.एच.महावरकर, लक्ष्मी गौतम, एस. जयकुमार, संदीप बी. पाटील, विरेंद्र मिश्रा, प्रताप दीघावकर यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.

नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था तर मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली कऱण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तर विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांना नियुक्त करण्यात आलं आहे. कोल्हापूर महानिरीक्षकपदी मनोजकुमार लोहिया यांना नियुक्त करण्यात आलं आहे. अमरावतीच्या आयुक्तपदाची जबाबदारी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांना देण्यात आली आहे.

देवेन भारती यांची उचलबांगडी

दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक देवेन भारती यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 10:26 pm

Web Title: maharashtra top most 25 ips officers transfer cm uddhav thackeray jud 87
Next Stories
1 राज्यात १७,४३३ नव्या करोनाबाधितांची नोंद; २ लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
2 सोलापुरातील धक्कादायक प्रकार; चक्क करोनादेवीची केली स्थापना
3 धार्मिक स्थळांसाठी आंदोलन सरकारला जागं करण्यासाठीच : इम्तियाझ जलील
Just Now!
X