07 March 2021

News Flash

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या तातडीने सोडवण्यात येतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतेली २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांना व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडवण्यात येतील असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत १ लाख २५ हजार ४४९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. उद्या रविवार सुट्टी असल्याने सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभआ शुक्ला यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पहिली प्रायोगिक तत्वावरील यादी २४ फेब्रुवारीला लावण्यात आली होती. त्यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. या दुसऱ्या यादीनंतर राज्यात आत्तापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर कऱण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्ह्यात पूर्णांशाने तर ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने १३ जिल्ह्यांमध्ये अंशतः याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा रितीने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील अपेक्षित अशा ३६ लाख ४५ हजार कर्ज खात्यांपैकी पोर्टलवर ३४ लाख ९८ हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या २१ लाख ८२ इतकी आहे. शासनाने या खात्यांच्या कर्जमुक्तीसाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे ६ जिल्ह्यांमधील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत असे सहकार विभागाने सांगितले आहे. या प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँका २४ तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती बँका ७२ तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 8:56 pm

Web Title: maharashtra uddhav thackeray government announces second list of crop loan waiver scj 81
Next Stories
1 “आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही, त्यामुळे औरंगाबादचं नाव बदललंच पाहिजे”
2 राष्ट्रीय किर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे निधन
3 गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
Just Now!
X