गेल्या आठवड्यापासून म्हणजेच ५ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

१४ जूनपासून लागू होणार नवी नियमावली!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली आहे. दर गुरुवारी यासंदर्भात आढाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगर पालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून त्या त्या जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट (१० जून)

अहमदनगर – २.६३
अकोला – ५.३७
अमरावती – ४.३६
औरंगाबाद – ५.३५
बीड – ५.२२
भंडारा – १.२२
बुलढाणा – २.३७
चंद्रपूर – ०.८७
धुळे – १.६
गडचिरोली – ५.५५
गोंदिया – ०.८३
हिंगोली – १.२०
जळगाव – १.८२
जालना – १.४४
कोल्हापूर – १५.८५
लातूर – २.४३
मुंबई शहर आणि उपनगर – ४.४०
नागपूर – ३.१३
नांदेड – १.१९
नंदुरबार – २.०६
नाशिक – ७.१२
उस्मानाबाद – ५.१६
पालघर – ४.४३
परभणी – २.३०
पुणे – ११.११
रायगड – १३.३३
रत्नागिरी – १४.१२
सांगली – ६.८९
सातारा – ११.३०
सिंधुदुर्ग – ११.८९
सोलापूर – ३.४३
ठाणे – ५.९२
वर्धा – २.०५
वाशिम – २.२५
यवतमाळ – २.९१

district wise positivity rate in maharashtra
पॉझिटिव्हिटी रेटची जिल्हानिहाय आकडेवारी

काय आहेत निकष?

त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची तसेच ऑक्युपाईड म्हणजेच सध्या रुग्ण असलेल्या बेडची संख्या किती आहे, त्यावरून ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार…

पहिला गट – ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

दुसरा गट – ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

तिसरा गट – ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

चौथा गट – १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

पाचवा गट – २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी

महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉक! पण कशी होणार आकडेमोड? वाचा सविस्तर!

district wise oxygen bed occupancy in maharashtra
जिल्हानिहाय ऑक्सिजन बेडची स्थिती

ऑक्सिजन बेडची काय आहे स्थिती?

दरम्यान, राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार पॉझिटिव्हिटी रेटप्रमाणेच ऑक्सिजन बेड किती प्रमाणात भरलेले आहेत, त्यानुसार देखील जिल्ह्यांची वर्गवारी कोणत्या टप्प्यात करायची किंवा कोणते निर्बंध जिल्ह्यात लागू करायचे, याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे.

district wise oxygen bed occupancy in maharashtra new
जिल्हानिहाय ऑक्सिजन बेडची स्थिती

जिल्ह्यांमधील ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार सर्वाधिक भरलेले ऑक्सिजन बेड देखील पॉझिटिव्हिटी रेटनुसार कोल्हापूरमध्ये आहेत. कोल्हापूरमध्ये गुरुवारच्या आकडेवारीनुसार ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. त्यापाठोपाठ संधुदुर्गमध्ये ५१.५९ टक्के बेड, रत्नागिरीमध्ये ४८.७५ टक्के तर साताऱ्यामध्ये ४१.०६ टक्के बेड भरलेले आहेत.