News Flash

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला..

तापी नदीवर कोटय़वधी रुपये खर्च करुन मध्यम प्रकल्पांमध्ये अडवलेले पाणी कुठलाही वापर होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात गुजरातला सोडून देण्याची नामुष्की जलसंपदा विभागावर आली आहे.

| May 21, 2014 02:09 am

तापी नदीवर कोटय़वधी रुपये खर्च करुन मध्यम प्रकल्पांमध्ये अडवलेले पाणी कुठलाही वापर होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात गुजरातला सोडून देण्याची नामुष्की जलसंपदा विभागावर आली आहे. विशेष म्हणजे उपसा जलसिंचन विहिरींवरील कर्ज माफ करूनही सरकारकडून त्या कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाहीच होत नसल्यामुळे की काय शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला तिलांजली देण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.
जलसंपदा विभागाने तापी नदीवर ठिकठिकाणी मध्यम प्रकल्प (बॅरेज) उभारले आहेत. तापीतून राज्याच्या वाटय़ाला येणारे पाणी या प्रकल्पांमध्ये अडवून शेतांपर्यंत पोहोचविणे हा या प्रकल्प निर्मितीमागचा प्रमुख हेतू होता. त्याच अनुषंगाने नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात प्रकाशा, सारंगखेडा, सुलवाडे या ठिकाणी असे प्रकल्प बांधून त्यांच्यात पाणी अडविण्यास तीन ते चार वर्षांपासून सुरुवातही झाली. परंतु उपसा योजना कर्जांमुळे बंद पडल्याने अडविले गेलेले पाणी वापरातच येत नसल्याने ऐन उन्हाळ्यात हे पाणी गुजरातला सोडून दिले जात आहे.
* पाणी उपसणाऱ्या जलसिंचन विहिरी कर्जापायी बंद.
* उपसा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कोटय़वधींची गरज, मात्र सरकार उदासीन.
* मध्य प्रदेशातील पाऊस आणि हातनूरचे अतिरिक्त पाणी तापीत आल्याने साठय़ात वाढ.
* मेअखेर प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सोडणे बंधनकारक. त्यामुळे पाणी गुजरातकडे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 2:09 am

Web Title: maharashtra water to gujarat
Next Stories
1 ‘आप’मध्ये देणग्यांचा निधी लंपास झाल्यावरून मतभेद
2 रत्नागिरी जिल्ह्य़ात वादळी वारे- विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू
3 तरतुदीतील दुजाभावामुळे महापालिकेत गदारोळ
Just Now!
X