07 April 2020

News Flash

एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष बरोबरीने काम करताना दिसतात.

सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष बरोबरीने काम करताना दिसतात. मात्र असे एक क्षेत्र आहे की ते म्हणजे एसटी महामंडळातील चालकांची जागा, यावर आजवर पुरुषांची मक्तेदारी होती. पण आता याच एसटीच्या चालक म्हणून महिलांच्या हाती स्टेअरींग असणार आहे. असा निर्णय घेणारे देशातील महाराष्ट्र राज्य पाहिले ठरले आहे. चालक आणि वाहक प्रशिक्षण पदासाठी पात्र ठरलेल्या महिलांचा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यातील काही महिलांशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने नांदेड येथील रब्बाना ह्यातखान पठाण यांच्याशी संवाद साधला आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी हे गाव तीन हजाराच्या आसपास गावांची लोकसंख्या आहे. या गावांत रब्बाना ह्यातखान पठाण या राहतात. आई वडील शेती करतात. तर चार भाऊ आणि चार बहिणी असे मोठे कुटुंब आहे. त्या घरात मोठ्या असल्याने त्यांचे लहान वयातच लग्न झाले. घरी सर्व काही ठीक चालले असताना त्याच दरम्यान मुलगा झाला. त्यानंतर पतीच्या त्रासामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग पुढे काय करायचा असा प्रश्न निर्माण झाला.
सातवी पर्यंत शिक्षण झाले होते. आता पुढे शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला घरातील सर्वांनी पाठिंबा देखील मग मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा दिली. त्यात चांगल्या मार्काने उत्तीर्ण देखील झाल्यावर बीए करण्याचे ठरविले आणि आज बीएच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. संपूर्ण काळ खूप कठिण होता. या दरम्यान शिवणकाम, सेक्युरीटीची काम देखील केले.

त्याच दरम्यान माझी चार ही भावंडे चार चाकी गाडी चालवित असल्याने मी देखील गाडी चालविणे शिकले होते. हे करताना घरातील कोणी ही केव्हाच अडविले नाही. पेपर मध्ये एसटी महामंडळात चालकांची जाहिरात आली. मग विचार केली की, मी आजवर गाडी चालविली आहे. आता एसटी चालवून नागरिकाची सेवा करू अशी भावना मनात निर्माण झाली आणि मनापासून इच्छा व्यक्त केली. आज चालकाचे प्रशिक्षण घेण्यास पात्र ठरले आहे. आता लवकरच एसटी चालविण्यास मिळेल याचा खूप आनंद असून चार चाकी गाडी चालविण्यास भावाकडून प्रेरणा मिळाली आहे. जरी मी या क्षेत्राकडे आली असले, तरी माझे पोलिस खात्यात जाण्याचे स्वप्न होते. पण या पुढे परीक्षा देऊन पोलीस विभागात प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर ज्या प्रकारे मी एका गावातून आलेली महिला एसटीची चालक म्हणून लवकरच जबाबदारी हाती घेणार आहे. तशी समाजातील प्रत्येक महिलांनी आव्हाने स्विकारल्यानंतर यश निश्चित मिळतं आणि कोणत्याही परिस्थितीला डगमगून जाऊ नका असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 6:17 pm

Web Title: maharashtra women st driver nanded rubina pathan dmp 82
Next Stories
1 देशाने उत्तम संसदपटू गमावला, जेटलींच्या निधनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
2 आजारपणातही जेटली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे – चंद्रकांत पाटील
3 जेटलींच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित
Just Now!
X