18 March 2018

News Flash

महाराष्ट्रातील भूमिका घेणारे साहित्यिक कुठे गेले? राज ठाकरेंचा सवाल

समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे.

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: January 14, 2018 6:15 PM

Raj Thackeray : राज यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणीबाणीचा काळ आणि केरळमधील साहित्य चळवळीचा दाखला देत राज्यातील साहित्यविश्वाला फटकारले. समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडताना दिसत नाही. त्यामुळे आतातरी महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीविषयी बोला , त्याबद्दल लिहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत प्रत्येक टप्प्यावर साहित्यिक ठाम भूमिका घेताना दिसत होते. मात्र, हल्लीचे साहित्यिक राज्यात घडत असलेल्या घटनांविषयी भूमिकाच घेताना दिसत नाहीत. आज गप्प बसलात तर भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील साहित्यिकांना कानपिचक्या दिल्या. ते रविवारी सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या औदुंबर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलत होते.

यावेळी राज यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणीबाणीचा काळ आणि केरळमधील साहित्य चळवळीचा दाखला देत राज्यातील साहित्यविश्वाला फटकारले. समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडताना दिसत नाही. त्यामुळे आतातरी महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीविषयी बोला , त्याबद्दल लिहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हा समृद्ध वारसा पाहून अनेक लोक याठिकाणी येतात. मात्र, आजच्या घडीला महाराष्ट्रात ज्याप्रकारची षडयंत्र रचली जात आहेत किंवा अतिक्रमण सुरु आहे, त्याविरोधात राज्यातील लेखक, कवी या सर्वांनीच ठाम भूमिका घेतली पाहिजे. ही शहरं तुमची आहेत, याची जाणीव ठेवून सगळ्या राजकीय आणि जातीय भिंती पाडून टाका. महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटांचा प्रतिकार करा, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

यापूर्वीच्या साहित्यिकांच्या लिखाणातून आपल्याला महाराष्ट्रातील परिस्थितीचे भान येईल. मात्र, आपण त्यांचे साहित्या वाचणारच नसू तर केवळ एका दिवसाचे साहित्य संमेलन भरवून काहीच उपयोग नाही. आपल्याला इतिहासातील चुकांमधून बोधच घ्यायचा नसेल, तर अशा साहित्य संमेलनांचा फायदाच काय? त्यामुळे आपण साहित्य वाचून कितपत बोध घेतो, हे महत्त्वाचे आहे. आज ज्या वेगाने घडामोडी सुरू आहेत त्या पाहता राज्यातील प्रमुख शहरं आपल्या हातातून गेली तर महाराष्ट्राला काही किंमत उरणार नाही, असे सांगत राज यांनी पुन्हा एकदा शहरांतील परप्रांतियांच्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय, त्यांनी सध्या केरळमध्ये सुरू असलेल्या साहित्य चळवळीचे उदाहरण दिले. केवळ साहित्य संमेलनं भरवण्यापेक्षा आपल्या भाषेतील साहित्य जगापर्यंत पोहोचवा. दक्षिणेकडील राज्यात सरकार अशा साहित्य चळवळींच्या पाठिशी ठामपणे उभे राहते. तेथील साहित्यिकदेखील राज्यातील परिस्थितीवर परखडपणे भाष्य करतात. मात्र, आपल्याकडे सध्या तसे होताना दिसत नाही. यापूर्वी विजय तेंडुलकर , पु.ल. देशपांडे यांनी आपापल्या काळात ठामपणे भूमिका घेतल्या होत्या. यापैकी काही भूमिका या अतिरेकीही असतील पण त्यांनी भूमिका घेतली, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राजकारणाचा विचार न करता महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी परखडपणे बोलले पाहिजे. निवडणुका असतील तेव्हा आपण भले एकमेकांच्या उरावर बसू, पण त्या संपल्यानंतर एकदिलाने मराठी हितासाठी काम करुयात, हे धोरण स्वीकारा. त्यामुळे किमान आतातरी सरकार कोणाचे आहे, याचा विचार न करता आपली भूमिका मांडा, असे राज यांनी साहित्यिकांना सांगितले.

First Published on January 14, 2018 5:44 pm

Web Title: maharashtra writer poets literature community should take stand on happening in society says raj thackeray
 1. अतुल पाटणकर
  Jan 15, 2018 at 9:09 am
  मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’ अशी खळबळजक विधाने करणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडलेला दिसतो.
  Reply
  1. A
   Arun
   Jan 14, 2018 at 9:27 pm
   सगळ्यांवर एकदम घसरू नका. शेवटी सोबतीला कोणीच रहाणार नाही.
   Reply
   1. MILIND PATHAK
    Jan 14, 2018 at 8:42 pm
    आपल्याला नावडते मत ऐकायची तयारी आहे का? विरोधी मत दिले तर मारझोड, तोडफोड. त्या पेक्षा बाबारे, तुम्ही काय म्हणाल ते खरं!
    Reply
    1. Mangesh Keluskar
     Jan 14, 2018 at 7:47 pm
     महाराष्ट्राचे नवनिर्माण करणारे जिकडे गेले तिकडेच ते पण गेले
     Reply
     1. श्रीपाद कुलकर्णी
      Jan 14, 2018 at 7:18 pm
      भूमिका घ्यायचि म्हणजे टीका करायची जेणेकरून तुझा राजकीय फायदा होईल असेच ना?
      Reply
      1. S
       Shriram Bapat
       Jan 14, 2018 at 7:02 pm
       राजसारख्या ठोकशहाच्या साहित्य संमेलनातील मंचावरच्या भाषणामुळे मराठी साहित्यीकांबद्धल चुकीचे संदेश जात असून साहित्यिकांचा बुध्यांक अगदी खाली आहे असे वाटण्याची शक्यता आहे. या आगंतुकाच्या आक्रमणावर साहित्यिकांनी जरूर लिहावे.
       Reply
       1. S
        Satya
        Jan 14, 2018 at 6:18 pm
        लिहिनाऱ्यांनी अजूनही तुमच्या मर्जी प्रमाणे लिहावे का.....
        Reply
        1. U
         Umesh
         Jan 14, 2018 at 6:15 pm
         स्वत:चे नगरसेवक सांभाळता येत नाहीत तरी इतरांना सल्ले द्यायचे उद्योग सुरु आहेत स्वत: झोपा काढायच्या आणि साहित्यिकांना सरकारविरोधात भडकवायचे याने स्वत:ची कुवत आधी ओळखावी राजकारणातून बाद झालेला हा फडतूस माणूस आहे
         Reply
         1. Abhay Tipnis
          Jan 14, 2018 at 5:50 pm
          राज साहेब .. सध्या जो खर बोलतो तो देशद्रोही समजला जातो... ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे
          Reply
          1. Load More Comments