News Flash

सुरक्षा भेदून मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न करणारा तरूण पोलिसांच्या ताब्यात

बेरोजगार तरुणाचे कृत्य

राळेगणसिद्धी येथे सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशांत कानडे (वय २५) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पाण्याची रिकामी बाटली जप्त करण्यात आली आहे. नोकरीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तो स्टेजच्या दिशेने पळत जात होता.

कृषीपंपांना बारा तास सलग वीज पुरवण्यासाठी राळेगणसिद्धीत दोन हजार मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी दुपारी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी मंचावर पोहोचल्यावर एक तरुण सुरक्षारक्षकांचे कडे भेदून मंचाच्या दिशेने पळाला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला रोखले आणि त्याची रवानगी स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली.

प्रशांत महादेव कानडे असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नगर तालुक्यातील मेहेकरीचा निवासी आहे. प्रशांत हा मूकबधीर असून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. बँकेत शिपाई पदावर नोकरी मिळावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो हताश होता. नोकरीसाठी त्याने मुख्यमंत्री कार्यालयाला १० महिन्यांपूर्वी निवेदनही दिले होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला उत्तर आले नव्हते.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील गोंधळाबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे म्हणाले, सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाणाऱ्या तरुणाला आम्ही ताब्यात घेतले. सभेत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांवर शाईफेकीचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे शाईची दौत सापडली नसल्याचे गाडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शाईफेकीचा प्रयत्न ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 2:53 pm

Web Title: maharashtra youth detained by police who trying to reach closer to cm devendra fadnavis in ralegan siddhi
Next Stories
1 कृषीपंपांना वीज पुरवण्यासाठी अभिनव ‘सौर-मंत्र’!
2 सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत’चे विदर्भाकडे लक्ष
3 वस्त्रोद्योग कामगारांच्या ‘भविष्य निर्वाहाचे’ काय?
Just Now!
X