‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’च्या (एनएसडी) द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या तमाशाचे सादरीकरण केले. भारतभरातून आलेल्या या अमराठी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून तमाशा रंगवला. पुढे या तमाशाचे दिल्लीतही प्रयोग होणार आहेत.

गेल्या एका महिना एनएसडीचे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत तमाशाचे प्रशिक्षण घेत होते. एनएसडी दरवर्षी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थाना एखाद्या राज्यात पाठवून तेथील लोककलेचा अभ्यास करून सादरीकरणाची संधी देत असते. या वर्षी महाष्ट्रातल्या पारंपरिक तमाशाची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाच्या चौकटीत राहून सैद्धांतिक शिक्षण घेतले नाही तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात जाऊ न अस्सल तमाशाही अनुभवला. नाशिक येथे कै. विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळात जाऊन ‘कनातीतला फडाचा तमाशा’ तर सणसवाडीत जाऊन रेश्मा वर्षां परितेकर यांचा ‘संगीत बारीचा तमाशा’ दाखवण्यात आला.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. वामन केंद्रे, अभिनेत्री सुषमा देशपांडे, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. शैलेश श्रीवास्तव, हिमानी शिवपुरी, शकुंतला नगरकर, हेमाली म्हात्रे, मेघा घाडगे अथंबर शिरढोणकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर योगेश थोरात (नृत्य), सागर जोशी (ढोलकी) व सुभाष खराटे (हार्मोनियम) आणि कृष्णा मुसळे, विकास कोकाटे (ढोलकी) यांनी प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण दिले. हिंदीतून सादर होणाऱ्या या तमाशातील गण, गवळण बतावणीचे लेखन डॉ. गणेश चंदनशिवे यांनी तर ‘खेल कुर्सी का’ या हिंदी वगनाटयाचे लेखन डॉ. मिलिंद इनामदार यांनी केले आहे.
सोमवारी रवींद्र नाटय़ मंदिरात या तमाशाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तमाशात पारंपरिक गीत वगळता संपूर्ण तमाशा हिंदीतून सादर करण्यात आला.

काश्मिरी मावशी –

एनएसडीमधून आलेला जुनेद हा काश्मीरचा आहे. तमाशात तो मावशीची भूमिका साकारत आहे. त्याला हिंदी भाषा येत नसल्याने त्याने संपूर्ण तमाशाची संहिता उर्दूत लिहून पाठ केली आणि तितक्याच चपखलतेने सादर केली. या काश्मिरी मावशीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

तमाशा ग्रामीण रंजनापलीकडे जावा –

देशभरातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी एका महिन्याच्या प्रशिक्षणात तमाशा केवळ शिकला नाही तर आपलासा केला. तमाशा म्हणजे अश्लिलता असा समज घेऊ न आलेल्या या मुलांना तमाशाचा खरा अर्थ क ळला. हिंदीतून सादर होणारा हा तमाशा ग्रामीण रंजनापलीकडे जाऊ न देशभरात पाहिला जावा. जेणेकरून त्याला राष्ट्रीय कलेचे स्वरूप प्राप्त होईल.
गणेश चंदनशिवे, विभागप्रमुख, लोककला अकादमी.