महाराष्ट्रात आज ३४२७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ११३ मृत्यूंची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४९ हजार ३४६ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता १ लाख ४ हजार ५६८ इतकी झाली आहे.

राज्यात मागील चोवीस तासांमध्ये ११३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ही ३८८० झाली आहे. मागील चोवीस तासांमध्ये नोंद झालेल्या ११३ मृत्यूंमध्ये ७३ पुरुष तर ४० महिला रुग्णांचा समावेश होता. ११३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ६५ रुग्ण होते. तर ३८ रुग्णांचे वय ४० ते ५९ वयोगटातले होते. १० रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. ११३ पैकी १० रुग्णांच्या अतिजोखमीच्या आजारांबद्दल माहिती मिळालेली नाही. उर्वरित १०३ रुग्णांमधल्या ८३ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे जोखमीचे आजार आढळले.

मागील २४ तासांमध्ये एकूण मृत्यूंपैकी ७३ मृत्यू मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरित मृत्यू २७ मे ते १० मे जून या कालावधीतले आहेत. आजपर्यंत ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १ लाख ४ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८३ हजार ३०२ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.