30 September 2020

News Flash

सांगलीतील त्या तिघांसाठी सदाभाऊ खोत ठरले ‘देवदूत’

आठ दिवसांपासून महापूरात अडकलेल्या तिघांचा प्राण सदाभाऊ खोत यांनी वाचवला

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सध्या पूरग्रस्त स्थिती राज्यातून त्यांना मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत पूरामध्ये अडकलेल्या सांगलीमधील तिघांसाठी देवदूत ठरले आहेत. आठ दिवसांपासून महापूरात अडकलेल्या तिघांचा प्राण सदाभाऊ खोत यांनी वाचवला आहे.

गेले आठ दिवसापासून बहे (ता. वाळवा जि. सांगली) येथील रामलिंग बेटावर अडकलेल्या पुजारी (अनिल सिताराम बडवे वय 65, सुमन अनिल बडवे वय 55 व त्यांची नाथ मोहिनी कुलकर्णी वय 20) कुटुंबासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देवदूत ठरले. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे सदाभाऊंची मदत यशस्वी झाल्याने बहे व वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सदाभाऊंच्या धाडसाला सलाम केला.

वाळवा तालुक्याला कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या महापुराने वेढा दिला आहे. गेले तीन दिवस शासकीय यंत्रणा व कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून जास्तीत जास्त मदत कशी पूरग्रस्तांच्या पर्यंत पोहचेल यासाठी खडा पहारा देऊन कार्यरत आहेत. या सर्वांचा कळस व एक मोठे आव्हान म्हणून बहे येथील रामलिंग बेटावर पुरात अडकलेल्या 2 महिला व एक पुजाऱ्याला बाहेर काढणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

प्रचंड पाऊस व तासतासाला वाढणारी पुराची पातळी यामुळे रामलिंग बेटाकडे जाण्याचा जलमार्ग खडतर होत होता. यासाठी प्रशासनाकडे हेलिकॉप्टरची मदत मागण्यात आली होती. आज बुधवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली नाही. व रामलिंग बेटावर अडकलेल्या लोकांचा धीर तुटल्यावर सदाभाऊंनी व्हाईट आर्मीच्या लोकांना घेत बहे येथील पुरात स्वतः उतरण्याचा निर्णय घेतला. जीवाची पर्वा न करता बोट घेऊन ओढ्यामार्गे बहे गावाला वेढा टाकत अडथळे पार करत नदीचे मुख्य पात्र गाठले.

नदीच्या तीव्र प्रवाहाच्या उलटे जात 3 किलोमीटर जात बोटीतून सदाभाऊंनी रामलिंग बेट गाठले. यावेळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी ही भाऊंना तुम्ही स्वतः जाऊ नका फार मोठी रिस्क आहे, अशी विणवणी केली. मात्र गावगड्यात वावरलेल्या सदाभाऊंनी कोणाचेही न ऐकता स्वतः जात त्या दोन महिला व पुज्यऱ्याला घेऊन आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 6:44 pm

Web Title: maharshtra flood 2019 sadabhau khot saved three people in sangali flood nck 90
Next Stories
1 पालघरमध्ये गढूळ पाऊस?; नागरिकांमध्ये चर्चांना उधाण
2 कोल्हापूरनंतर पावसाचा मोर्चा खान्देशात; १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
3 ‘त्या’ जीआरचा चुकीचा अर्थ काढण्यात आला-मुख्यमंत्री
Just Now!
X