18 September 2020

News Flash

वीरा साथीदारांचे व्याख्यान वादात सापडण्याची चिन्हे

विद्यापीठाचे कुलसचिव खान यांनी यासंदर्भात बोलताना नमूद केले की, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत केवळ सूचित केले आहे.

|| प्रशांत देशमुख

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची परवानगी नव्हती

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात  वीरा साथीदार यांच्या व्याख्यानाचे विद्यार्थी संघटनेने केलेले आयोजन वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

विद्यार्थी नेता रोहित वेमुल्ला याच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी हिंदी विद्यापीठात वीरा साथीदार यांच्या व्याख्यानाचे आयोजन  करण्यात आले होते. यूथ फ ॉर स्वराज या संघटनेतर्फे  आयोजित या कार्यक्रमाची विद्यापीठ प्रशासनास माहितीच नव्हती. या संदर्भात विचारणा केल्यावर माहिती घेत असल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र कार्यक्रम स्थळी भेट दिल्यावर प्रशासनाने या कार्यक्रमाची धास्ती घेतल्याचे चित्र दिसून आले. पत्रकारांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलसचिव खान यांनी यासंदर्भात बोलताना नमूद केले की, विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत केवळ सूचित केले आहे. त्याची परवानगी आम्ही दिलेली नाही. कार्यक्रमाचे चित्रीकरण केले जाणार असून त्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. या संदर्भात सध्याच काही सांगता येणार नसून कार्यक्रम झाल्यावरच सर्व स्पष्ट होईल, असा खुलासा खान यांनी केला. कार्यक्रम आयोजक विद्यार्थी नेता योगदीप झा हे म्हणाले की, आम्ही विद्यापीठ प्रशासनास सूचित केले आहे. केवळ सूचना देणे पुरेसे असून परवानगीचा प्रश्नच नाही. विद्यार्थ्यांना कार्यक्रम घेण्याचा अधिकार असल्याचे झा यांनी नमूद केले.

सहा महिन्यांपूर्वीच हे विद्यापीठ वेगळय़ाच कारणाने चर्चेत आले होते. डाव्या चळवळीशी संबंध असल्याची चर्चा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामूहिक पत्रलेखनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्मीर प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चांगलाच तणाव विद्यापीठ परिसरात निर्माण झाला. प्रशासनाने सहा विद्यार्थ्यांना निलंबित केले. निलंबनाच्या कारवाईमुळे सर्वत्र गदारोळ उडाला. त्याची दखल घेत प्रशासनाने विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले. आता वीरा साथीदार यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात विद्यापीठ काय भूमिका घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:52 am

Web Title: mahatma gandhi international hindi university akp 94
Next Stories
1 शोभेच्या दारूकामासह ‘लेझर शो’ने लाखो नेत्रांचे पारणे फिटले
2 राज्यातील कलेचा आद्य पुरावा अद्यापही वाऱ्यावरच
3 पाथरीत साई जन्मभूमी विकासासाठी कृती समिती
Just Now!
X