राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून येत आहे. आरोग्य विभागाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या आजाराबाबतच्या जागृतीसाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. एवढच नाहीतर आता म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देखील केले जाणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, ज्या करोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.

म्युकरमायकोसिसचा मोठय़ा प्रमाणात फैलाव

नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे टोपे यांनी सांगितले. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरी परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या आजावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असू त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

‘म्‍युकोरमायकॉसिस’चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्‍यात : मुनगंटीवार

या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रीत ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

आगामी काळात या रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त –

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याबरोबरच नाकावाटे यात बुरशी शरीरात प्रवेश करते. ही बुरशी डोळ्यातील पेशी व मेंदुतही प्रवेश करते. यात अनेकांना अंधत्व आले असून या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त वाढू शकते. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना सुज व लालसर डोळे होणे आदी याची लक्षणे असून स्टिरॉइडचा जादा वापर केल्यामुळे हा आजार होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर अॅम्फोथ्रीसिन बी प्लेन याच्या १४ वायलचा डोस देणे गरजेचे असून राज्यातील अनेक भागात आज हे इंजक्शन उपलब्ध नाही. अतिदक्षता विभागातील जवळपास पाच टक्के रुग्णांना म्युकरमायकोसिसचा त्रास आढळून आला असून आगामी काळात या रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.