News Flash

…तोपर्यंत आम्ही एकत्र; महाविकास आघाडीबद्दल काँग्रेस नेत्याचं महत्त्वाचं विधानं

"भाजपाचे नेते समाजात अपप्रचार करण्याचे काम करतायेत"

राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारविषयी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलेलो आहोत. आमच्यात यात शंका नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवावा वाटत असेल तर तेही साहजिक आहे,” असं सांगत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोठं विधान केलं.

पुणे येथील काँग्रेस भवन मध्ये सचिन सावंत बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर हे देखील उपस्थित होते. सचिन सावंत म्हणाले,”शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे. सर्वजण आपली ताकद वाढावी, यासाठी प्रयत्न करणार, त्यामध्ये काही गैर नाही. भाजपाचे लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत. तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू. त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलायय त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल,” असं सचिन सावंत म्हणाले.

पुढे बोलताना सावंत म्हणाले,””मागील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांना कधीच विश्वासात घेतले नाही. पण महाविकास आघाडी सरकारने सर्वांना सोबत घेऊन आरक्षणाच्या मुद्यावर काम केले आहे. हे पाहून भाजपाच्या नेत्यामध्ये पोटदुखी दिसून येत आहे. यातूनच भाजपाचे नेते समाजात अपप्रचार करण्याचे काम करीत आहे. हे त्यांनी लवकर थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच “या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार देखील भूमिका जाहीर करीत नाही,” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 8:41 pm

Web Title: mahavikas aghadi sachin sawant uddhav thackeray thackaray sarkar maharashtra govt ncp congress shivsena bjp bmh 90
Next Stories
1 राज्यात आज ८ हजार ४३० जणांची करोनावर मात; रिकव्हरी रेट ८९.५३ टक्क्यांवर
2 मराठा आरक्षण: ठाकरे सरकारची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
3 “नेमका काय गोंधळ…,” सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
Just Now!
X