21 September 2020

News Flash

सौरऊर्जा वापरणाऱ्यांनाच महावितरणकडून कररुपी दणका

सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना महावितरणला प्रतियुनिट कर  द्यावा लागणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर

लातूर : महावितरण कंपनीवर आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांना व शेतकऱ्यांना कमी पशात वीज द्यावी लागत असल्याने हा तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना आखल्या जात असून आता सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना महावितरणला प्रतियुनिट कर  द्यावा लागणार आहे. भले त्यासाठीची गुंतवणूक वैयक्तिक केलेली असली तरी नव्याने कर आकारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच तसा प्रस्ताव दाखल केला आहे, त्याला विरोध करण्यासाठी विविध संघटना सक्रिय झाल्या आहेत.

आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जेचे उत्पादन करून महावितरणला ती ऊर्जा न विकता स्वत: वापर करणार असल्यास अशा ग्राहकांना दरमहा प्रतिकिलोवॅट ६४५ रुपये महावितरणला कर म्हणून द्यावा लागणार आहे. याशिवाय ज्यांनी उत्पादित केलेली सौरऊर्जा मिटिरगद्वारे महावितरणला देऊ केली आहे अशा घरगुती ग्राहकाला प्रतियुनिट ४ रुपये ४६ पैसे ते ८ रुपये ६६ पैसे महावितरणला द्यावे लागतील. वाणिज्य वापर करणाऱ्यांसाठी प्रतियुनिट ५ रुपये ६ पैसे ते ८ रुपये ७६ पैसे तर औद्योगिक वापर करणाऱ्यांना ३ रुपये ६० पैसे ते ४ रुपये ८ पैसे प्रतियुनिट द्यावे लागणार आहेत.

नागपूर येथील ‘महासोलार’ संघटनेचे संयोजक विपूल जोईत्सर म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ‘ग्रीडसपोर्ट चार्जेस’ या नावाखाली जो जिझिया कर लागू केला आहे तो इतिहासातील काळ्या कायद्याच्या तुलनेचा आहे. हा कर पूर्णपणे बेकायदेशीर असून या विरोधात संघटनेच्यावतीने न्यायालयात दाद मागू.’

स्वतचे भांडवल गुंतवून जी मंडळी सौरऊर्जा उत्पादित करतात त्यांना पूर्वी शासनाच्यावतीने अनुदान दिले जायचे. आता हे अनुदान तर बंद झालेच आहे शिवाय सौरऊर्जा उत्पादित केली म्हणून वहनाच्या खर्चापोटी महावितरणने कर आकारण्याचे ठरवले आहे.

इतर राज्यात प्रोत्साहन

कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या प्रांतात सौरऊर्जा उत्पादकांना प्रोत्साहन देणारे धोरण राबवले जाते. महाराष्ट्रात मात्र शासकीय धोरणांमुळे आता या उद्योजकांना परप्रांतात जावे लागेल. यापुढे कोणीही सौरऊर्जेचा वापर करण्याचे धाडसच करणार नाही, असे उद्योजक सांगत आहेत. विशेष म्हणजे विविध वृत्तपत्रांत महावितरणच्यावतीने जाहिरात देऊन कर आकारणीसाठी नागरिकांकडून याबाबतीत सूचना मागवण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:22 am

Web Title: mahavitaran impose taxes per unit on solar power users zws 70
Next Stories
1 प्रसाद लाड यांनी घेतलेली भेट राजकीय नाही-अजित पवार
2 शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही हे शिकवलं – रोहित पवार
3 मुंडे बहीण-भाऊ एकाच मंचावर आले अन् …
Just Now!
X