News Flash

Coronavirus – राज्यात आज ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले, १५५ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संग्रहीत

राज्यात करोनाचा संसर्गाचा उद्रेक पाहायाल मिळत आहे. दिवसेंदिवस करनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन करनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील दररोज करोनाबाधित मोठ्यासंख्येने आढळतच आहेत. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज २६ हजार २५२ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींकडे महत्वाची मागणी

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. करोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, आता या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 9:40 pm

Web Title: mahrashtra reports 47288 new covid19 cases and 155 deaths msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींकडे महत्वाची मागणी
2 दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांचं राज्यपालांना पत्र
3 राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव!
Just Now!
X