15 August 2020

News Flash

जामखेड दुहेरी हत्याकांड : मुख्य सूत्रधाराला अटक

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.

योगेश अंबादास राळेभात आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार उल्हास माने याला अटक केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात सुरूवातीला हल्लेखोर गोविंद गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

उल्हास माने हा भाजपा नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. तो आधी मनसे, त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपामध्ये आहे. वर्षभरापूर्वी माने याच्या तालमीतील मुलांशी फलक लावण्याच्या कारणावरून योगेश व राकेशचा वाद झाला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले असून मानेच्या तालमीतील पैलवानांनीच ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जामखेडमधील बीड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेल्या शनिवारी संध्याकाळी हे हत्याकांड घडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात हे दोघे त्या हॉटेलमध्ये असताना या दोघांवर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात योगेश आणि राकेश या दोघांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, राकेशने मृत्युपूर्वी गोविंद गायकवाडने हा गोळीबार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गोविंद गायकवाडसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल केल्यानंतर गोविंद हा शिरुरजवळील मांडवगण फराटा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली होती. तसेच, एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले होते. या अटकेच्या वेळीच उल्हास माने याच्या अडचणीत वाढ होणार, असा अंदाज बांधण्यात येत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2018 1:22 pm

Web Title: main accused in ahmednagars jamkhed ncp workers double murder case arrested
Next Stories
1 छगन भुजबळ सुटणार म्हणून समर्थकांनी दगडूशेठ गणपतीसमोर केली आरती
2 गडचिरोलीतील नक्षल चकमकीवरील संशय कायम
3 ‘तीन महिन्यांत प्लास्टिक आवरण असलेल्या खाद्यपदार्थाचा साठा संपवा’
Just Now!
X