News Flash

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील चार तरूणांचा मृत्यू

हे सर्वजण भोर तालुक्यातील चारोळा या गावातील रहिवासी होते

पुणे-सातारा महामार्गावर गुरूवारी झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. हे सर्वजण शिरवळ येथून पुण्याकडे परतत होते. त्याचवेळी साताऱ्याच्या हद्दीतीत वडाप येथे त्यांची जीप सिमेंटच्या कठड्याला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जीपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण भोर तालुक्यातील चारोळा या गावातील रहिवासी होते. या अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नसले तरी पोलिसांकडून या सगळ्याचा तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2016 8:25 am

Web Title: major accident on mumbai satara national highway
टॅग : Mishap
Next Stories
1 सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात वरिष्ठ अधिकाऱ्यासह दोघे ठार
2 अवघे राज्य मंत्रिमंडळ शुक्रवारपासून मराठवाडय़ात!
3 अलिबाग तालुक्यात पक्ष्यांच्या १६३ प्रजातींचे वास्तव्य
Just Now!
X