क्विंटलला आधी सोळा हजार, आता साडेअकरा हजार रुपये!
आहारातील आत्यंतिक गरजेच्या तूरडाळीने गेल्या आठवडय़ात गाठलेली उच्चांकी दरपातळी या आठवडय़ात घसरू लागल्याने सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. सोमवारी बाजारात सर्वच डाळींच्या भावात मोठी घसरण झाली. क्विंटलला सोळा हजार रुपयांपर्यंत सर्वोच्च भावापर्यंत गेलेल्या तूरडाळीचे दर शनिवारी अडीच हजारांनी, तर सोमवारी दोन हजार रुपयांनी खाली आले. या डाळीचा ठोक भाव २१५ वरून १८० रुपये, तर किरकोळीचा भाव २३५ वरून २०० रुपयांपर्यंत उतरला. डाळींच्या साठवणूकविषयक धोरणात्मक बदल केंद्र सरकारने दिलेला आदेश, तसेच मध्य प्रदेश सरकारने हा बदल पहिल्यांदा लागू केल्यामुळे बाजारपेठेतील कृत्रिम भाववाढ थांबण्यास मदत झाली आहे. बाजारपेठेत माल नसताना अचानक भाववाढ केली जात होती. कृत्रिम भाववाढीला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केल्याने बाजार चांगलाच हलला व भाववाढीची सूज ओसरू लागली.

आयात डाळींवर साठवणुकीसंबंधीचे कोणतेच नियंत्रण सरकारचे नव्हते. त्यामुळे ही भाववाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने या धोरणात आता बदल करण्यास सुरुवात केली असून स्थानिक बाजारपेठेसह आयातीवरील साठवणुकीसंबंधीही नियंत्रण केले जाणार आहे. राज्य सरकारही डाळीच्या साठवणुकीसंबंधी तातडीने अध्यादेश काढेल,ही चर्चा सोमवारी बाजारपेठेत होती.

Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
share market today
शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

डाळीची दर उतरण!
’तुरीच्या भावात शनिवारी एकाच दिवशी अडीच हजार रुपयांनी हे भाव खाली आले.
’सोमवारी याचीच पुनरावृत्ती होऊन २ हजार रुपयांची घसरण झाली. तुरीचे भाव आता ११ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत उतरले
’हरबऱ्याचे भाव ५ हजार २०० रुपयांवरून ५ हजार, तर हरबरा डाळीचे भाव ७० रुपयांवरून ६५ रुपये झाले. मुगाच्या भावातही ५०० रुपयांची घट झाली असून सोमवारी हे भाव क्विंटलला ९ हजार रुपये होते.
’मूग डाळीचे भाव किलोमागे १२० रुपयांवरून १०८ रुपये झाले आहेत. उडदाच्या भावातही २ हजार ४०० रुपयांची घट झाली हे भाव ११ हजार १०० झाले.

देशातील स्थिती
ग्राहक कामकाज मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तूरडाळीचे देशातील सरासरी भाव सोमवारी २०० रु होते. गेल्या वर्षी ते ८५ रु. किलो होते. गेल्या पाच वर्षांत तूरडाळीचा भाव ७४-८५ रु. किलो होता. उडीदडाळीचा भाव १७० रुपये किलो होता व गेल्या आठवडय़ात तो १८७ रु.किलो होता. गेल्या वर्षी उडीदडाळीचा भाव हा ९८ रु. किलो होता. दिल्लीत ४०० केंद्रीय भांडारे व मदर्स डेअरीची सफल दुकाने येथे कमी दरात विक्री सुरू आहे. आंध्र व तामिळनाडू सरकारने आयात तूरडाळीची विक्री सुरू केली आहे.