जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाने २१ पैकी ११ जागा जिंकत काठावरचे बहुमत मिळवले. विरोधी विखे-भाजप-शिवसेना यांच्या संयुक्त विकास आघाडीला १० जागा मिळाल्या. राष्ट्रवादी व विखे गटाला प्रत्येकी ७, काँग्रेसला ४ तर भाजपला ३ जागा मिळाल्या.
मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. सेवा संस्था- अकोले- सीताराम गायकर (७२, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), शिवाजी धुमाळ (१२, विखे). संगमनेर- रामदास वाघ (११५, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), रंगनाथ खुळे (१४, विखे). नेवासे- यशवंतराव गडाख (११९, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), भगवान गंगावणे (१३, विखे). श्रीरामपूर- जयंत ससाणे (४१, विजयी, विखे), इंद्रभान थोरात (२३, स्वतंत्र). श्रीगोंदे- दत्ता पानसरे (७३, विजयी), प्रेमराज भोईटे (३५), बाबासाहेब भोस (एकही मत नाही, दोघेही स्वतंत्र). कर्जत- अंबादास पिसाळ (३८, विजयी, विखे), विक्रम देशमुख (३४, राष्ट्रवादी-थोरात). जामखेड- जगन्नाथ राळेभात (३०, विजयी, विखे), रामचंद्र राळेभात (१७, राष्ट्रवादी-थोरात). कोपरगाव- बिपीन कोल्हे (७३, विजयी, विखे-भाजप-सेना), अशोक काळे (४०, राष्ट्रवादी-थोरात).                
शेतीपूरक संस्था– रावसाहेब शेळके (७१५, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), दादासाहेब सोनमाळी (३३८, विखे). बिगरशेती संस्था- आ. अरुण जगताप (८७८, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), सबाजी गायकवाड (४६७, स्वतंत्र). इतर मागासवर्ग- सुरेश करपे (१८३०, विजयी, विखे), अनिल शिरसाठ (१७३४, राष्ट्रवादी-थोरात), बाबासाहेब भोस (११९, स्वतंत्र). अनुसूचित जाती/जमाती-आ. वैभव पिचड (२०३४, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), अशोक भांगरे (१६६८, विखे). भटक्या जाती/जमाती- बाजीराव खंडुजी खेमनर (२२६१, विजयी, राष्ट्रवादी-थोरात), सुभाष गिते (१३४६, विखे), बाजीराव गेणुजी खेमनर (३७), शिवाजी चिमाजी शेलार (२५, दोघेही स्वतंत्र). महिला राखीव- चैताली आशुतोष काळे (२१३७) व मीनाक्षी सुरेश साळुंके (१६७९ दोघीही विजयी, राष्ट्रवादी-थोरात), प्रियंका राहुल शिंदे (१३५५), सुरेखा भानुदास कोतकर (१५८१, दोघीही विखे), अश्विनी सुभाष केकाण (२५०, स्वतंत्र).
निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील माजी सैनिक केंद्राच्या सभागृहात सकाळी ८ वाजता जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू करण्यात आली. नगरचे तालुका उपनिबंधक संभाजी कदम व पारनेरचे सहायक उपनिबंधक रावसाहेब खेडकर यांनी त्यांना साहाय्य केले. १४ टेबलवर ७५ कर्मचारी मोजणी करत होते. सेवा संस्था मतदारसंघातील पहिला निकाल साठेआठच्या सुमारास जाहीर करण्यात आला. त्यानंतर अध्र्या तासाने शेतीपूरक मतदारसंघातील, साडेनऊच्या सुमारास बिगर शेती मतदारसंघातील व शेवटी साडेबाराच्या सुमारास राखीव मतदारसंघातील ५ निकाल जाहीर करण्यात आले.
मतमोजणी ठिकाणी महापौर संग्राम जगताप, खेमनर, आ. पिचड, उदय शेळके, रावसाहेब शेळके आदी उपस्थित होते. मात्र वरिष्ठ नेते तेथे फिरकले नाहीत. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे आदी जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानी बसलेले होते. तेथेच त्यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.
गटातटांचे बलाबल
राष्ट्रवादी- थोरात गट प्रण्ीात शेतकरी मंडळ (एकूण ११)- सीताराम गायकर, रामदास वाघ, यशवंतराव गडाख, रावसाहेब शेळके, आ. अरुण जगताप, आ. वैभव पिचड, बाजीराव खंडुजी खेमनर, चैताली ईशुतोष काळे व म१नाक्षी सुरेश साळुंके. या गटाचे उदय शेळके, चंद्रशेखर घुले यांची याप३र्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. विखे-भाजप-शिवसेना प्रण१त संयुक्त विकास आघाडी- जयंत ससाणे, जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, दत्ता पानसरे, बिपीन कोल्हे, सुरेश करपे. या गटाचे आ. शिवाजी कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, राजीव राजळे, अरुण तनपुरे यांची याप३र्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
बाप-लेक विजयी
एकाच घरातील दोघे बँकेचे संचालक होण्याची परंपरा यंदा घुले घराण्याने चालू ठेवली. बँकेचे विद्यमान संचालक चंद्रशेखर घुले व त्यांच्या कन्या चैत्राली ईशुतोष काळे हे दोघेही या निवडणुकीत विजयी झाले आहेत. दोघेही राष्ट्रवादी-थोरात गटाकडून विजयी झाले असून काळे या माजी आमदार अशोक काळे यांच्या स्नुषा आहेत.