रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ‘गराडा’ गावाजवळून जाणाऱ्या गोंदिया-चंद्रपूर रेल्वे रुळावर मालगाडीची धडक झाल्याने नागझिरा अभयारण्यातील टी-१४ वाघिणीच्या नर बछड्याचा जागीच मृत्यू झाला. नागझिरातील पूर्व भागातुन गोंदिया चंद्रपूर ही रेल्वे लाईन जाते. अभयारण्याच्या लगत असल्याने वन्यजीवांचा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असतो.

टी-१४ वाघिणीला तिनं बछडे होते. दुर्घटनेत एका बछड्याचा मृत्यू झाला असून एक बछडा जखमी झाल्याचं कळत आहे. टी-१४ वाघिण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ह्या भागात विचरन ( टेरोटेरी) क्षेत्र स्थापित केलेली आहे, सदर बछडे सहा ते आठ महिन्याचे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतानाही वन्यजीव विभाग, वन विभाग व रेल्वे विभाग यांच्याकडून विशेष उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या