News Flash

Malegaon Bomb Blast Case: चार आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील धनसिंग, लोकेश शर्मा, मनोहर नवारिया आणि राजेंद्र चौधरी या चार आरोपींना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आरोपींना २०१३ मध्ये अटक झाली होती.

मालेगाव येथील मशिदीबाहेर ८ सप्टेंबर २००६ रोजी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटामध्ये ३७ जण मृत्यूमुखी तर १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी २०१३ साली मनोर सिंह, राजेंद्र चौधरी, धनसिंह आणि लोकेश शर्मा या चौघांना अटक केली होती. यातील लोकेश शर्मा हा ‘समझौता एक्स्प्रेस’ स्फोट प्रकरणातीलदेखील आरोपी होता. तीन वर्षांपूर्वी लोकेश शर्मा आणि धनसिंह या दोघांना एनआयएने आरोपमुक्त केले होते.

दरम्यान, या प्रकरणाची एनआयएच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. गेल्या आठवड्यात खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या खटल्यातील सुनावणीत हजेरी लावली.त्या देखील या प्रकरणात आरोपी आहेत. कोर्टाने त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले यावर ‘मला माहिती नाही’, अशा स्वरुपाची उत्तरे त्यांनी कोर्टासमोर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 11:41 am

Web Title: malegaon bomb blast case bombay high court grants bail to 4 accused
Next Stories
1 राज्यातील मार्डचे डॉक्टर संपावर, कोलकाता येथील डॉक्टरच्या मारहाणीचा निषेध
2 धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
3 औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ
Just Now!
X