राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धरणगांव नजीक असलेल्या रसोया कंपनी समोर ट्रक व टाटा मॅक्स मध्ये झालेल्या अपघातात 13 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धरणगांव जवळच असलेल्या रसोया कंपनी समोर मुंबई कडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रक क्र MH 40 BG 9112 व मलकापुरहुन अनुराबाद कडे जाणाऱ्या टाटा मॅक्स क्रमांक MH 46 X 7925 मध्ये दुपारी 2.30 वाजेदरम्यान भिषण अपघात झाला.  या मध्ये टाटा मॅक्स मध्ये असलेल्या 16 जणांपैकी 13 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताबरोबर नगराध्यक्ष अँड हरीश रावळ अँम्बुलन्स,क्रेन,घेवुन अपघातस्थळी पोहचले, उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीष बोबडे,शहर पो.नि.हनुमंत गायकवाड, ग्रा.पो.नि.जायभाये आदी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. नागरीकांच्या सहकार्याने ट्रक खाली दबलेल्या मँक्सीमोतील तिघा जख्मींना क्रेनच्या साह्याने बाहेर काढले या अपघातात अनिल मुकुंद ढगे वय 40 रा.अनुराबाद, किसन सुकदेव बोराडे वय 42 रा.अनुराबाद, नथ्थु वामन चौधरी वय 40 रा.अनुराबाद, छाया गजानन खडसे वय 40 रा.अनुराबाद, प्रकाश किसन भारंबे वय 40 रा जामनेर रोड,भुसावळ, मेघा प्रकाश भारंबे वय 35 रा.जामनेर रोड,भुसावळ, सोमीबाई छगन शिवडतकर वय 26 रा.नागझिरी जि.बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश)ह.मु.अनुराबाद,सतिश छगन शिवडतकर वय 03 रा.नागझिरी, विरेन गोकुळ भिलवतकर वय 07 रा.नागझिरी(मध्यप्रदेश),मिनाबाई बिलोरकर,आरती,रेखा,असे सहा महिला,पाच पुरूषांसह दोन मुलांचा समावेश आहे.

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या अपघात ग्रस्त ट्रकात स्फोटक साहित्य असल्याने व ग्रामस्थांचा रोष पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी बोबडे यांनी नगरपालीकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलाविले.शहर ,ग्रामीण पोलीस,हायवे पोलीसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली,जख्मींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, उप अधिक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी भेट दिली.मृतकांचे शवविच्छेदन उशिरा पर्यंत सुरु होते,या अपघातानंतर अनुराबाद गावावर शोककळा पसरली होती.