नगर : शहरातील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात  घडली.  पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला तीन दिवस, दि. २० पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज, मंगळवारी  दिला.

प्रेमसंबंध निर्माण करून गेल्या अडीच वर्षांपासून १७ वर्षांच्या मुलीला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहरातील  एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरमधील नालेगाव येथील शुभम ज्ञानदेव सुडके याच्याविरुद्ध पळवून नेणे, बलात्कार करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

२०१६ पासून आरोपी व मुलीचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर आरोपी पीडित मुलीवर संशय घेऊ न तिला मारहाण करत होता. तिला दोन वेळेस मारहाण केल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवरून माळीवाडा भागातून जात असताना आरोपी शुभम सुडकेने कारमधून त्यांचा पाठलाग करून पीडितेला दुचाकीवरून उतरवून त्याच्या कारमध्ये बसवून पळवून

नेले. त्यानंतर दिल्ली गेट पार्किंगमध्ये कार उभी करून लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडीतून मुलीला घरी सोडले. हा प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर दोघींनी घरी जाऊ न घडलेला प्रकार शुभम सुडकेच्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर पुन्हा नेप्ती चौकात बोलावून मुलीला मारहाण करून तिच्या आईला त्रास देण्यास सुरुवात केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शुभम सुडके हा सातत्याने त्रास देत असल्याने पीडित मुलगी व तिच्या आई यांनी ‘चाइल्डलाइन’ची मदत घेतली.

‘चाइल्डलाइन’च्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने पीडित मुलीने कोतवाली पोलिस स्टेशनला जाऊ न आरोपी सुडकेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी सुडके याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी दिली.