04 April 2020

News Flash

शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीस अटक

पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

कोपरगाव :  मुलीला मोबाइल घेऊ न देऊ न सुरुवातीला गोड बोलून नंतर तिला व तिच्या आजीला जिवे मारण्याची धमकी देऊन एका तरुणाने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. अविनाश नारायण पंडोरे (वय २८, रा. मोहिनीराजनगर) कोपरगाव याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी आई व आजी सोबत राहत असून ती नववीत आहे. मुलीचा वारंवार मोबाइलवर  बोलण्याचा संशय आल्याने शाळेच्या शिक्षिकेने त्याची चौकशी करून तिचा मोबाइल ताब्यात घेतला तेव्हा मोबाइल वर असलेले संदेश वाचून शिक्षिकेने मुलीच्या आईला बोलावून घेतले. नंतर मुलीस संदेशांबाबत विचारले असता  तिने घडलेली घटना सांगितली. याप्रकरणी मुलीने आरोपीविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सोमनाथ वाघचौरे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2020 12:12 am

Web Title: man arrested for raping school girl zws 70
Next Stories
1 सांगलीची वसंतदादा  सहकारी बँक पुन्हा चर्चेत!
2 बहिरम यात्रौत्सवात सामाजिक प्रबोधनाचा गंध
3 महाविद्यालयीन कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानेच होणार-उदय सामंत
Just Now!
X