इस्टाग्रामच्या माध्यमांतून २० वर्षीय तरूणी आणि २३ वर्षीय तरूणाची ओळख झाली. त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले. पण एका दिवशी तरूणाने व्हॉट्सअॅपवरून आपले नाते संपल्याचे सांगत ब्रेकअप केले. प्रेमभंगाचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात गेलेल्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार पुण्यात घडला आहे. वडिलांनी मुलीचा मोबाइल पाहिल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेजल विजय पावसे (वय २०, रा. हनुमानगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने तक्रार दिल्यानंतर ऋषीकेश प्रदीप यादव-पाटील (वय २३, रा. सांगली) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश हा सांगलीचा आहे.

प्रसार माध्यामांच्या वृत्तानुसार, ऋषीकेश आणि सेजलची यांची वर्षभरापूर्वी ‘इस्टाग्राम’वर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या काही दिवसांपासूर्वी ऋषीकेश पुण्याला आला होता. सेजलची भेट घेऊन गेल्यानंतर त्याने एके दिवशी तिला व्हॉटसअॅपवर मेसेज केला. ‘तू तुझ्या आयुष्यात सुखी रहा..माझ्याशी संपर्क ठेवणे बंद कर, मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे; मी तुला वेळ देऊ शकणार नाही. आता आपल्यामध्ये कोणतेही नाते राहिलेले नाही,’ हा त्याचा आलेला मेसेज पाहून सेजलला धक्का बसला. या नैराश्यातून तिने १७ डिसेंबरला घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.