News Flash

वरातीत नाचणारा घोडा उधळल्याने एकाचा मृत्यू

बिथरलेल्या घोडय़ाने सभोवताली उभे असलेल्यांपैकी अनिल गायकवाड याच्या तोंडावर जोराची लाथ मारली.

(संग्रहित छायाचित्र)

सोलापूर : लग्नाच्या वरातीत घोडा नाचविण्याचे प्रकार वरचेवर वाढत आहेत. पाठीवर नवरदेव बसलेल्या अवस्थेतही घोडा हौसेने नाचवला जातो. परंतु माढा तालुक्यातील अंजनगाव (खेलोबा) येथे एका लग्नाच्या वरातीत नाचणारा घोडा अचानकपणे उधळला आणि घोडय़ाने लाथ मारल्यामुळे एका रिक्षाचालकाला स्वत:चा जीव गमवावा लागला. अनिल गुंडिबा गायकवाड (वय ४५) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे.

अंजनगाव खेलोबा येथे किसन वाघमोडे यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता. अक्षता पडण्यापूर्वी नवरदेवाची वरात काढण्यात आली. घोडय़ावर ऐटीत बसलेला नवरदेव आणि समोर  वाजणारा बॅन्जो व ढोली-बाजा अशा वातावरणात नवरदेवाकडील नातेवाईक व मित्र मंडळी नाचत-बागडत हळूहळू पुढे जात होते.

ऐटबाज असलेल्या घोडय़ाला वरातीत नाचविण्याचा प्रकारही सुरू झाला. घोडा नाचवत नवरदेवाची वरात गावातील मारुतीच्या मंदिरात गेली.

नवरदेव मारुतीरायाच्या दर्शनासाठी घोडय़ावरून खाली उतरला आणि तो परत येईपर्यंत वरातीतील मित्र मंडळींचा जोश कायम होता. त्या वेळी मोकळा असलेला घोडा काही उत्साही मंडळी नाचवत होते. त्या वेळी नाचणारा घोडा पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळींसह बघ्यांची गर्दी झाली होती.

तेव्हा नाचत नाचत घोडा एकदा अचानकपणे उधळला. तेव्हा एकच गोंधळ उडाला. बिथरलेल्या घोडय़ाने सभोवताली उभे असलेल्यांपैकी अनिल गायकवाड याच्या तोंडावर जोराची लाथ मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला. मृत गायकवाड हा रिक्षाचालक होता. तो घरातील कर्ता होता. रिक्षा चालवून तो घरचा उदरनिर्वाह चालवत असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 4:07 am

Web Title: man dies after dancing horses kicks
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीत पेरले तेच विधानसभा निवडणुकीत उगवणार?
2 विदर्भवाद्यांना पुन्हा धक्का
3 जागतिक तंबाखूविरोधी दिन : तंबाखूमुळे देशात दरवर्षी १३ लाख लोकांचा मृत्यू
Just Now!
X