महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळयाभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते. त्याच्या गळयामध्ये एक दोरी टाकली होती. हीच दोरी तरुणासाठी जीवघेणी ठरली.

“मृत तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत मागच्या पाचवर्षांपासून प्रेमसंबंध होते. एकत्र वेळ घालवण्यासाठी गुरुवारी रात्री दोघे खापरखेडा येथील लॉजवर आले होते. शरीरसुखाचा आनंद घेत असताना, महिलेने त्या तरुणाचे हात-पाय नायलॉनच्या रशीने खुर्चीला बांधले होते. महिलेने त्याच्या गळयाभोवती सुद्धा एक दोरी टाकली होती” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

“त्या तरुणाला खुर्चीला बांधल्यानंतर महिला वॉशरुममध्ये गेली. त्याच दरम्यान खुर्ची खाली पडली. तरुणाच्या गळयाभोवतीचा दोर आवळला गेला आणि श्वास कोंडला गेल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला” असे अधिकाऱ्याने सांगितले. “महिला बाहेर आली, तेव्हा आपला जोडीदार जमिनीवर निपचित पडल्याचे तिला दिसले” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

या प्रकारानंतर घाबरलेल्या त्या महिलेने मदतीसाठी लॉजमधल्या कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी सर्वप्रथम तरुणाच्या हात-पायाचे दोर सोडवले. लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचे महिलेने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉजचा मॅनेजर, वेटरची जबानी पोलिसांनी नोंदवली. मृत तरुण आणि महिलेला मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. तूर्तास या प्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.