05 March 2021

News Flash

चंद्रपूर : आठ जणांचा फडशा पाडणारा नरभक्षक वाघ अखेर जाळ्यात

दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात आज ‘आरटी-१’ या नरभक्षक वाघास पकडण्यात वन विभागाच्या पथकास यश आलं. भयंकर दहशत माजवणाऱ्या या वाघाने साधारण २१ महिन्यात आठ जणांचा व २५ जनावरांचा फडशा पाडला आहे. तर, काहीजण या वाघाच्या हल्ल्यात जखमी देखील झाले आहेत.

या नरभक्षक वाघास शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता, मात्र आज त्याला सापळा रचून पकडण्यात यश आले. या वाघास पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश दिले होते. तेव्हापासून वनविभागाची पथकं त्याच्या मागावर होती. रात्रीच्या वेळी या हा वाघ जास्त फिरत होता.

या नरभक्षक वाघास जिवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २५ वनरक्षकांची चार पथके (STPF), १४ गावांतील ३५ स्वयंसेवक यांच्यासह ४ पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. शिवाय, त्याच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते.

अखेर, चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावा जवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला. या वाघाला पशूवैद्यकीय पथकाच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. प्रचंड दहशत माजवणाऱ्या या नरभक्षक वाघास जेरबंद करण्यात आल्याचे समजताच, स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 9:35 pm

Web Title: man eater tiger who killed eight people captured in chandrapur district msr 87
Next Stories
1 गांधील माश्यांच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू
2 महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, जाणून घ्या किती रुग्ण झाले बरे?
3 दसरा मेळाव्याचे नव्हे शिमग्याचे भाषण; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
Just Now!
X